Monday 18 July 2011

येऱ्या गबाळ्याचे काम नोहे!

आतापर्यंत अक्षर आणि लिप्यांची आपण ओळख करून घेतली, आज केवळ मौज म्हणून काही सुलेखने वाचूया.
अमीन अल मुल्क अशरफ अल दौला अलीक्झान्दर हान्नी बहादूर अर्सलन जंग  ११८५ (हिजरी )
नस्तलिक़ लिपीतील हा मुद्रालेख, पाचूवर कोरला आहे. सोन्याच्या, हिऱ्यांनी सजवलेल्या अंगठीवर वेलबुट्टी आहे. विलियम हेस्टीगच्या फौजेतील मेजर अलेक्झांडर हान्नी भारतात अठराव्या शतकात आला. अर्थातच अत्यंत महत्वाकांक्षी, लोभी आणि साहसी असा हा लष्करी अधिकारी, मूळचा स्कॉट शेतकऱ्याचा मुलगा. युरोपातील सप्तवार्षिक युद्धात शौर्य गाजवून ४ ऑगस्ट १७६४ ला तो बंगाल मध्ये इस्ट इंडीया कंपनीच्या बंगाल आर्मीत सामील झाला.
रोहीलखंडातील अफगाणांनी  मराठ्यांविरोधात शुजा उद दौलाची मदत घेतली, पण त्या बदल्यातील रक्कम अदा करायला नकार दिला.
शुजा उद दौलाने इंग्रजांची मदत मागीतली, २३ एप्रील १७७४ ला मिरंपूर कत्रा च्या लढाईत इंग्रजांनी ४०,००० रोहिल्यांची फौज गारद केली. या लढाईत झालेल्या अत्याचार, लुटीवर बंगाल कौन्सीलने चौकशी कमिटी बसवली. वॉरन हेस्टीगच्या बाजूने साक्ष देणारा, गव्हर्नर जनरल च्या गळ्यातला ताईत बनला. पुढची सर्व कहाणी अवधच्या अनन्वीत लुटीची आहे. इंग्रजांच्याच शब्दात "त्याच्या छळाला कंटाळून झालेल्या बंडात १७८१ साली अवधच्या बेगमेच्या प्रेरणेने बनारसच्या राजा चैतसिंगाने ४००० ईग्रज शिपाई मारले, हान्नीला वाचवायला हेस्टीगला फौज पाठवावी लागली, हान्नी एखाद्या रक्त पिऊन फुगलेल्या जळूसारखा प्रचंड संपत्ती घेऊन कलकत्त्यात परतला पण....
वर्षभरातच एक्केचाळीसाव्या वर्षी मरून गेला."
त्याच्या अफाट संपत्तीतील ही अंगठी,
"अमीन अल मुल्क अशरफ अल दौला अलीक्झान्दर हान्नी बहादूर अर्सलन जंग  ११८५ (हिजरी )" हा मजकूर कोरलेली. 
वाचताना पर्शीयन नियमाप्रमाणे उजव्या खालच्या कोपऱ्यापासून सुरुवात करावी, नंतर वरच्या ओळीतील उजव्या बाजूने वाचावे.



Saturday 16 July 2011

फारसी कॅलीग्राफी - फार्सी सुलेखन २- अरबी

अक्षराची भूमिती
अरबी लिपीत अक्षरांच्या भौमितिक आकारांचे प्रमाण सौंदर्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. सरळ उभ्या दंडाने दर्शवलेल्या ‘अलिफ’ या पहिल्या अक्षराच्या मापाने पुढील सर्व अक्षरांचे आकार ठरतात. ‘अलिफ’ हा लेखकाच्या शैली नुसार तीन ते बारा टिंबांच्या मापाचा असतो. टिंब लेखणीच्या टोका इतका असावा. तितकीच जाडी ‘अलिफ’ ची असावी. ‘अलिफ’च्या व्यासाचे वर्तुळ सर्व अक्षरांना सामावून घेते. 

  • अरबी सुलेखन - शैली

सुलेखन कलेत या लिपी इतके प्रयोग आणि वैविध्य इतरत्र क्वचितच सापडते. शंभरावर शैली प्रसिद्ध असल्या तरी त्यांचे- कुफि(कुफिक़) ही भौमितिकदृष्ट्या प्रमाणबद्ध आणि नस्ख, रुक़ा, तुलुथ आणि इतर लपेटीदार अक्षरशैली असे प्रमुख दोन प्रकार पडतात.

  • कुफी 
शिलालेख वगैरे कोरण्यास आयताकृती, भौमितिक आकार यामुळे वापरली जाणारी.{वाचन :- बिस्मिल्लाह अल रहमान अल रहीम}












  • तुलुथ
तुलुथ म्हणजे १/३ तृतीयांश, लेखणीच्या आकारामुळे हे नाव पडले आहे. ही लिपी तुमार या लिपीवरून तयार झाली. {वाचन :- बिस्मिल्लाह अल रहमान अल रहीम}











  • नस्ख نسخه
copy म्हणजे नक्कल या अर्थाच्या शब्दाने ओळखली जाणारी नस्ख लिपी प्रमाणबद्ध आणि सुवाच्य आहे. त्यामुळेच धर्मग्रंथ, पुस्तके याच लिपीत लिहीत. 
{वाचन :- बिस्मिल्लाह अल रहमान अल रहीम}





    • ता लिक़ 

    तालिक़ म्हणजे टांगलेली, फारसी ने ९व्या शतकात संशोधित केलेली लिपी, यात शब्दातील अक्षरे एकमेकांना जोडली जाताना बेसलाईन पासून वर चढत जातात. {वाचन :- बिस्मिल्लाह अल रहमान अल रहीम}




    • दिवानी

    ता’लिक़ वरून ओटोमान तुर्कांनी आपल्या दरबारी पत्रांसाठी तयार केलेली दिवानी लिपी, आपल्या गिचमीडपणात अव्वल आहे.

















    • रिक़ा
    लिहायला सोपी आणि वेगवान लिपी रोजच्या लिखाणाला उपयुक्त.


    केवळ अक्षरातून चित्र निर्माण करण्याची शैली फारसीत रूढ झाली.




    • प्रतिबिम्ब










    • तोघ्रा













    अक्षरचित्र.

    Thursday 14 July 2011

    फारसी कॅलीग्राफी - फार्सी सुलेखन

    या आधी म्हणजे ‘फार्सी लिपीचे प्रकार’ या धड्यात [link: http://farsi-marathi.blogspot.com/2011/02/blog-post_8188.htmlआपण फारसी लिपीचे प्रकार पाहिले आहेत. 
    नेस्ख आणि तालिक़ या लिप्यांच्या संगमातून बनली ‘नेस्तालिक़’ लिपी. सुलेखन (खरं तर अक्षरचित्रे ) काढण्यासाठी हिचा फार उपयोग केला जातो. हिला अक्षरचित्रांची वधू(प्रियतमा) म्हणून लाडाने ओळखले जाते. कालौघात हिच्यात फार थोडे बदल झाल आहेत. ‘मीर अली तब्रीझी’ यांनी सातशे वर्षांपूर्वी तयार केलेले वळण इतकं संपूर्ण आहे की त्यात बदल असंभव!


    सोबतच्या चित्रात कलम तासण्याची रीत दाखवलेली आहे. 
     ‘कलम’च्या टोकाच्या प्रमाणात अक्षरे त्यांची उंची दाखवलेली आहे.

    Thursday 9 June 2011

    १००० वेळा वाचला गेलेला !

    मी का फारशी शिकलो?
    मागल्या फ़ेब्रुवारीत माझा दुचाकीवर अपघात झाला, डावा कोपर मोडला. आता मिळालेल्या सक्तीच्या विश्रांतीत काय करावे? म्हणून मी हा ब्लॉग लिहायला सुरुवात केली. त्यातून वेदना विसरून गेलो.
    फार वर्षांपूर्वी आमच्या कॅंपातल्या शाळेत एक पैसा सापडला. हा कंपनी सरकारचा होता. त्यावर एका बाजूला एक तराजू आणि काही अगम्य अक्षरे होती. अरबी वळणाची अक्षरे पाहून अर्थ लावण्यासाठी माझी धडपड सुरू झाली. आमच्या शेख सरांनी "अ द ल " वाचून दाखवले. त्याचा अर्थ न्याय असा सांगीतला. मग सापडेल तसा फारसी शब्दांच्या मागे लागलो, शोधून साठवू लागलो.
    ज्या गावी जाईन तिथे फार्सी पुस्तके शोधू लागलो. अलीगढ, हैदराबाद, दिल्ली, पुणे, मुंबई- येथे जाणाऱ्या मित्रांना सांगू लागलो. अगदी पाचगणीच्या न्यू इरा या शाळेशी संबंधित श्री  मसूद यानी तर इंटर्नेट्वरून सीडी मागवून आणून दिली. उमराणी काकांनी फ़ारसी - उर्दू शब्दकोष  हैदराबादहून आणून दिला. असे जवळपास गेली २५ वर्षे चालू होते.
    मात्र मराठीत या भाषेची साधने दुर्मीळ दिसली.
    मराठी माणूस इतिहासात रमणारा, त्यामुळे नव्या इतिहास लेखकांची चलती आहे. त्यांनाही काही शब्दांवरून - सुतावरून स्वर्ग गाठायची घाई.
    बाला किला, बाला घाट, पाईने विलायत यातील बाला आणि पाईन या शब्दांना अडखळून एक होतकरु इतिहासकार पडल्याचे माझ्या लक्षात आले.
    या ब्लॉगवर सर्वकाही आहे असा माझा दावा नाही! पण संशोधकांच्या मार्गावरील काटे जरा बाजूला झाले तरी खूप झाले.

    Saturday 30 April 2011

    बी बी सी न्यूज- फारसी {शाही विवाह सोहळा}

    مراسم عروسی سلطنتی

    مراسم عقد پرنس ویلیام و کیت میدلتون ساعت ۱۱ صبح به وقت بریتانیا در حضور میهمانان ویژه و در حالی که میلیون ها نفر در سراسر جهان از طریق تلویزیون نظاره گر آن بودند، در کلیسای وست مینستر در مرکز لندن انجام شد

    मरासम अगद परंस विलयाम व कीत मिदलतून  साअत ११ 
    (उत्सवाचे    लग्न             प्रिंस       विल्यम          आणि    केट मिडलटन            तास          ११)


    सबह बा वक्त ब्रीतानिया दर हझूर मिहमानान विझह  व दर हाली 
    (सकाळी वेळेवर        ब्रीटनच्या         च्या उपस्थितित         पाहुणे        स्पेशल     आणि  त्याच वेळी)      


    का मीलीवन हा नफ़र दर मरामर जहान अज तरीफ़ 
    ( ते     लाखो                     लोकांनी        सर्व              जगातील     द्वारा                  )


    तल्विजिवन नझारा गर आन बूदन्द. दर कलीसा ई वस्त मिन्सतर दर 
    (टेलीव्हीजन               पहात                 होते                           चर्च                             वेस्ट्मिनिस्टर )


    मरकज लन्दन अन्जाम शूद.
    ( मध्यभागी   लंडन (च्या)     होताना)


    राजपुत्र विलियम आणि केट मिडल्टन यांचा  लग्नसमारंभ ब्रिटीश वेळेनुसार सकाळी ११ वाजता विशेष अतिथींसमोर लंडनच्या मध्यभागी आसणाऱ्या वेस्त्मिनिस्टर मठात संपन्न होताना जगभरातील लाखो लोकांनी टेलीव्हिजनवर पाहिला.

    Marriage ceremony of Prince William and Kate Middleton Great Britain is a time of 11 am Special guests in attendance, and while millions of people worldwide via television were watching it, at Westminster Cathedral in central London was performed.

    Sunday 3 April 2011

    मराठी नववर्षाच्या शुभेच्छा!

    फारसीत ‘ नवरोज मुबारक ’ या शब्दांत नववर्षाच्या शुभेच्छा देतात.
    نوروز مبارک 

    नव रोज याचा अर्थ नवा प्रकाश असा होतो. मुळचा झरथ्रुष्ट्राने सुरू केलेला हा सण, आज मध्यअशियातील सर्व राष्ट्रांचा सण बनला आहे. २१ मार्चला होणाऱ्या वसंत संपाताच्या दिवशी हा सण येतो. वसंत ऋतूचा पहिला दिवस. पारसी नववर्ष या दिवशी सुरू होते.
    इराणी लोक शेवटच्या महीन्यात घराची साफ सफाई करतात. याला ख़ाने तेकौनी म्हणजे घर झटकणे म्हणतात. वसंत गोठलेल्या सृष्टीत नव्याने प्राण फुंकतो म्हणून हे महत्वाचे!
    सणासाठी नवे कपडे परीधान करून परिवारच्या गाठीभेटी , त्यातही ज्येष्ठांच्या भेटी घेतल्या जातात. भेटीला येणाऱ्यांचे स्वागत मेवा मिठायांनी केले जाते. मेजवान्या झडतात.
    लोक रस्त्यावर, गल्ल्यांतून जमतात. होळी पेटवतात, आणि त्याभोवती गातात ‘जर्दी ए मन अझअने तो, सोर्खी ए तो अझअने मन’ -हे अग्नी, माझ्या वर (हिवाळ्यात) पसरलेला पिवळेपणा तुला घे, तुझा (आरोग्याचा) लाल पणा मला दे.
    आपल्या होळी या सणाची आठवण होते ना?  

    फार्सी भाषा

    फारसी भाषा आजच्या घडीला इराण, अफ़्गाणीस्तान, ताजिकिस्तान ची राज भाषा आहे, तर आर्मिनिया, अझरबैझान, जॉर्जीया, कझाकस्तान, तुर्क्मेनिस्तान, तुर्की,उझ्बेकीस्तान, इराक, पाकीस्तान या भागातील लोकांना समजते. भारतीय भाषांवर प्राचीन काळापासून तिचा मोठा छाप आहे, काश्मिरी, उर्दू या शिवाय हिंदी आणि मराठीत रोजच्या वापरातील अनेक फार्सी शब्द आपल्याला सापडतात..
    आज भारतीय साहित्य सृष्टीला मोहात पाडणाऱ्या सादी, हाफ़ीज शिराझी, रूमी, उमर खय्याम यांच्यासह भारतातील अमीर खुस्रो, मिर्झा गालीब आणि इक्बाल (‘सारे जहांसे अच्छा’ वाले) यांच्या उत्तम रचना फार्सीतच आहेत. तसे ‘फार्सी, फारसी’ भाषिकांना स्वत:ला ‘पारसी’ भाषिक म्हणवून घेणं आवडतं, पण आपण आपल्या मराठीत फार्शी म्हणत आलो आहोत.
    फार्सीने अरबी लिपी घेतली तरी, भाषेचे नाते संस्कृतशी आहे.


    चि दानन्द मर्दूम कि दर जामा 
    नवीसीन्दा दानद कि दर नामा चीस्त---------सादी(गुलिस्तां)

    [माणूस कसा ओळखावा, की कपड्याच्या आत कोण आहे? लेखकालाच माहीत की पत्रात काय आहे?]




    बहर सद साल दौरे गीरद अज सर
    चे आं दौरां शुद आयद दौरे दीगर
    बरोजे चंद बा दौरां दवीदन
    च शायद दीदनो चे तवां शुनीदन ---------निजामी


    [प्रत्येक शतकानंतर नवे युग सुरू होते, त्या नंतर पुढचे युग, केवळ काही दिवस पाहून काय समजणार आहे?]

    बाज़ीचा-ए-अत्फ़ाल है दुनिया, मेरे आगे
    होता है शब-ओ-रोज़ तमाशा, मेरे आगे
    इक खेल है औरंग-ए-सुलेमां मेरे नज़दीक
    इक बात है ऐजाज़-ए-मसीहा, मेरे आगे
    जुज़ नाम, नहीं सूरत-ए-आ़लम मुझे मंज़ूर
    जुज़ वहम, नहीं हस्ती-ए-अशया, मेरे आगे
    होता है निहाँ गर्द में सहरा मेरे होते
    घिसता है जबीं ख़ाक पे दरिया, मेरे आगे
    मत पूछ कि क्या हाल है मेरा तेरे पीछे
    तू देख कि क्या रंग है तेरा, मेरे आगे
    सच कहते हो, ख़ुदबीन-ओ-ख़ुदआरा हूँ, न क्यों हूँ
    बैठा है बुत-ए-आईना सीमा, मेरे आगे
    फिर देखिये अन्दाज़-ए-गुलअफ़्शानी-ए-गुफ़्तार
    रख दे कोई पैमाना-ए-सहबा, मेरे आगे
    नफ़रत का गुमाँ गुज़रे है, मैं रश्क से गुज़रा
    क्योंकर कहूँ, लो नाम न उनका मेरे आगे
    ईमाँ मुझे रोके है, जो खींचे है मुझे कुफ़्र
    काबा मेरे पीछे है, कलीसा मेरे आगे
    आशिक़ हूँ, पे माशूक़-फ़रेबी है मेरा काम
    मजनूं को बुरा कहती है लैला, मेरे आगे
    ख़ुश होते हैं, पर वस्ल में, यूँ मर नहीं जाते
    आई शबे-हिजराँ की तमन्ना, मेरे आगे
    है मौज-ज़न इक क़ुल्ज़ुमे-ख़ूँ काश! यही हो
    आता है अभी देखिये क्या-क्या, मेरे आगे
    गो हाथ को जुम्बिश नहीं, आँखों में तो दम है
    रहने दो अभी साग़र-ओ-मीना, मेरे आगे
     हमपेशा-ओ-हमशरब-ओ-हमराज़ है मेरा
    'ग़ालिब' को बुरा क्यों, कहो अच्छा, मेरे आगे .................................................................'ग़ालिब'


    Tuesday 29 March 2011

    एक गाणे "यारी है इमान मेरा"




























































































    फ़ार्सी शब्द 
    खुदा                         देव
    बंदा                          भक्त
    हम पियाला             एकत्र पिणारा
    हम निवाला             एकत्र जेवणारा
    हम सफ़र                सहप्रवासी
    हम राज़                  एकमेकांची गुपीते माहीत असणारा
    ता कयामत             जगाच्या अंतापर्यंत
    साज ए दिल            हृदयाचे वाद्य
    नूर                    
    फ़िदा                  
    सादगी                      
    जिंदगी                
    बंदगी                
    गमगीन              
    गुल ए गुलज़ार
    बे ज़ार              
    नजर                
    नज़ारा              
    चश्म ए बद -  वाईट नजर
    शिकार
    हाल ए दिल
    हंसी
    जवान
    ममनून   -   अनुगृहीत
    दिलकश
    कुरबान







    माझा हात

    नखे        -    नाखोन
    तळहात  -    कफ़ ए दस्त
    बोटे        -    अंगोश्त
    मनगट   -    मोच ए दस्त
    नाडी       -    नब्ज
    हात       -     दस्त
    कोपर    -     आरंज
    बाहू       -     बाज़ू
    खांदा     -     शाना

    Sunday 27 March 2011

    माझे डोके



     डोके    -     सर
     केस    -     मू
     कपाळ   -  पिशानी
     भुवई    -   आबरू
     पापणी  -   पलक ए चश्म
     डोळा     -   चश्म
     नाक    -    दमाग़
     ओठ    -    लब
     तोंड     -   दहान
     हनुवटी -  चाना
     गाल   -    गुना
     चेहरा  -   सुरत
     कान   -   गुश
     पापणी चे केस -  मोजा
     घसा   -   गलू
     मान   -  गर्दन
     खांदा  -   शाना
     जीभ  -   ज़बान
     दात   -   दन्दन

    Friday 25 March 2011

    वाचन - सोपी वाक्ये

    • उजवीकडून वाचा


    من یک کتاب دارم 
    म र  दा    ब ता की   क ई  न म
    {मन ईक किताब दारम     }
    [माझ्याजवळ एक पुस्तक आहे]

    او یک قلم دارد 
    द र   दा   म ल क  क इ  उ(औ)
    {उ इक कलम दारद         }
    [त्याच्याजवळ एक लेखणी आहे ]




    شما اینجا هستید 
    द  स्ति   ह   जा   इं     मा श(शो)
    {शोमा इन्जा हस्तीद        }
    [तू इथे आहेस            }


    این درس آسان است 
    स्त  अ   न सा आ   स र द   न ऐ
    {ऐन दरस आसान अस्त   }
    [हा धडा सोपा आहे      ]


    Thursday 24 March 2011

    क्रिया विशेषणे

    •   नामाला अना ‘ انه ’ प्रत्यय जोडला की क्रियाविशेषण तयार होते.

    शरीफ़ - कुलीन = शरीफ़ाना 
    पादशाह - राजा = पादशाहाना

    • किंवा   बा ‘ با ’ प्रत्यय जोडला की क्रियाविशेषण तयार होते.
    फ़झल - श्रेष्ठता = बा फ़झल - श्रेष्ठत्वाने
    अस्तवारी - निश्चय = बा अस्तवारी
    दवलत - संपत्ती = बा दवलत

    फार्सी पत्र


    Friday 11 March 2011

    फार्सी लघुत्व दर्शक शब्द

    ह, चा, का, क या प्रत्ययांनी लहानपणा, नाजुकपणा दाखवला जातो.


          ك -  مردك  मर्द - मर्दक -छोटा माणूस 
                                  अस्ब - अस्बक - लहान घोडा

    अव्यय

    दोन शब्द जोडण्याचे काम अव्यय करते. फार्सीत यांचा फार वापर होतो.

    बाला - च्या वर
    पाईन - खाली
    जबर - वर
    जेर - खाली
    पीश - पूर्वी
    पेस - मागे, नंतर
    मियान- मध्ये
    पहलू - बाजूस
    नज्द, नज्दीक -जवळ
    बहर, बरायी - च्या कारणाने
    बुइरून - बाहेर (बाहेरून)
    अन्दरून - आत

    (अरबीतून आयात) 
    कबल - च्या पूर्वी
    बआद - च्या नंतर
    जेअहत - च्या दिशेने
    जानीब - कडेला

    जोडून वापरली जाणारी,
    अज, ज- पासून
    बर , आबर - च्या वर
    बे - ला
    बा - सह
    दर - च्या आत
    रा - कडे, चा
    अजबाला - वर पासून
    अजफ़राज - उंचापासून
    अज पाईन - खालपासून

     उभयान्वयी अव्यये
           व 
           हम, निज - च्या प्रमाणे
           अगर, गर - किंवा
           या - किंवा
           मगर- तरीही
           

    Thursday 10 March 2011

    वस्तूंच्या जागा

    • वस्तूचे स्थान दाखवताना, ‘खाना, गाह, जार, दान, स्तान’ हे प्रत्यय जोडतात.


    गुल इ स्तान  - गुलाबाची बाग
    खार इ स्तान -  काटेरी जागा

    हेन्दू - काळा = हेन्दूस्तान - काळ्या लोकांचादेश 


    नमक जार 
    शौर इ जार -   मीठाचे वाळवंट
    लाल: -त्युलिप =  लालहजार - त्युलिपचा वाफा


    सन्जल - जेवणे (पैसे देऊन) = सन्जलगाह/ सन्जल खाना - खाणावळ
    किताब - पुस्तक = किताब खाना - ग्रंथालय




    बुत कदा  - मुर्तीसह देऊळ


    कलमदान
    शमादान


    कोह सार - डोंगरी प्रदेश


    संग लाख - खडकाळ
    दीव लाख - शापित प्रदेश

    संज्ञा / substantives( भाववाचकनाम )


    • विशेषणाला ‘ई’ प्रत्यय जोडून भाववाचक नाम बनवता येते, जसे मराठीत ‘-पणा’ जोडतात.

    शर्मसार - शर्मसारी- सलज्जता
    स(/सि)याह - स(/सि)याही - काळेपणा


    • ‘ه’ ‘ह’ जर शेवटी असेल तर ‘की’ जोडतात
    बन्दा- बांधलेला- बन्दकी - गुलामी
    बिकाना -नवा- बिकानकी -नाविण्य



    • ‘अ’ जोडूनही करतात 

    गरम - गरमा - उब

    • क्रियापदाला( धातूला) अर प्रत्यय जोडून
    दीद - पाहा - दीदार -दष्टी
    गोफ्त -बोल- गोफ्तार-भाषण


    परवर- परवरश
    अलाइ-अलाइश



    • कर्ता, करणारा या साठी शेवटी ‘ न्दा ’ जोडतात

    फ़रीब- फ़रीबन्दा- फसवणारा
    फ़रोश- फ़रोशन्दा- विक्रेता



    • किंवा ‘बान, गर, गार’ हे प्रत्यय जोडतात.
    दस्त- हात= दस्तगार- हाताने काम करणारा
    अहन -लोह=अहनगर- लोहार
    दर- द्वार=दरबान -द्वारपाल



    गुणवाचक / Epithets

    याचे तीन प्रकार आहेत.

    1. नाम+धातूसाधित विशेषण /कृदन्त 
    2. नाम+विशेषण 
    3. नाम+नाम


    • नाम+धातूसाधित विशेषण /कृदन्त
    दिल आजार - हृदय पिळवटणारे
    गुल अफ़्शान - फूल चिरडणारे



    • नाम+विशेषण

    शिरीन गार - गोड आवाजाचा
    खुश अलहान - सदवर्तन



    • नाम+नाम

    परी रुई - परीचे मुख असणारी
    शीर(शेर)दिल - सिंह हृदयी


    याशिवाय उपपद + नाम अशीही गुणवाचके आहेत


    हम म्हणजे सह, एकत्र, 


    हमखाना - एकाच घरात राहणारे
    हम सोहबत - सोबती
    हम दम - एकत्र श्वास घेणारे
    हम दर्द - एकच वेदना भोगणारे
    हम मकतब - एकाच शाळेत जाणारे
    हम राज - एकच गुपीत असणारे
    हम बिस्तर - एकाच बिछान्यात झोपणारे


    ना, कम, बे कमतरता दाखवतात,


    नाअ(उ)मीद - निराश
    बेअमान - निर्दयी
    कमबहा - कमी किमतीचा



    • ना - नाही
    • बे -शिवाय
    • कम - थोडे

    नादान - अज्ञानी
    नामर्द - पुरुष नसलेला
    नापाक - अपवित्र

    बेखेरद - संवेदनाशून्य
    बे तमीज - भेदभाव न करता
    बे मसरफ़ - उपयोगशून्य
    बे दीन - अधार्मिक
    बे बाक - निष्काळजी

    कम तजरबा - कमी अनुभवी
    कम बुहा - कमी किमती
    कम रीश - पातळ दाढीचा



    • मालकीदर्शक झू, साहब, अमल +नाम

    झूजलाल - राजेशाही
    अहल हकमत - चातुर्याने
    साहब जमाल - सुंदर



    • नाम+वैपुल्य दर्शक सार, किन, मन्द, नाक, वार, वर

    शर्म सार - लाजलेला
    दानशमन्द -विद्वान
    गमगीन - दुःखपूर्ण
    जहरनाक - विषारी
    जान वर - जीव असलेला



    • नाम + इन

    जर इन - सोनेरी
    सीम इन - चन्देरी
    जमरदीन - पाचूचा बनवलेला

    • समानता दाखवणारा नाम+ सा, असा, वश
    अंबर आसा - अ‍ॅंबर सारखा 
    माह वश - चंद्रा सारखा
    सहरसा - जादूसारखा



    • रंग नाम + फ़ाम, गोन

    गुलफ़ाम - गुलाबाच्या रंगाचा

    Wednesday 9 March 2011

    रंग

    रंग -  रंग


    काळा - सियाह, मेश्की
    निळा - आबी
    नेव्ही ब्लू - सुरमेई
    टॉरकॉइज - फेरुझी
     तपकिरी -गह्वेइ
    हिरवा  - सब्ज
    नारंगी - नारेंजी
    गुलाबी - सुरती
    जांभळा - बनफ़्श
    लाल - किर्मिज
    पांढरा - सफेद
    पिवळा - झर्द


     

    मी कुठे आहे?

    मागे              अगब
    च्या समोर     जेलो ये
    दूर                दूर
    जवळ            नजदिक
    विरुद्ध            मुकाबेल
    इथे                इन्जा
    तिथे              उन्जा


    उत्तर              शोमाल
    दक्षिण            जानूब
    पूर्व                 शर्घ
    पश्चिम            गर्ब

    मी कसा आहे?

    मी आनंदी आहे         मन खुशाल अम
    मी थकलो आहे         मन खस्ते अम
    मी हिंदू आहे              मन हेंदू अम
    मी तहानेला आहे       मन तेश्ने अम

    Tuesday 8 March 2011

    फार्सी शिष्टाचार

    • मराठी संभाषणातील शिष्टाचाराप्रमाणेच, फार्सीत नावाने हाक मारत नाहीत. लहान मुले आणि मित्राना नावाने बोलावता येते. 
    • मोठ्यांना आडनावापुढे पुरुष असेल तर आगा, स्त्री असेल तर खानूम या पदव्या श्रीमान, श्रीमती प्रमाणे लावून बोलावतात. कार्यालयात हुद्द्या आधी या पदव्या लावून संबोधित करतात.


    काही फार्सी हुद्दे, व्यवसाय 


    • वकील      वकील
    • न्यायाधीश   काझी    
    • सेक्रेटरी     मुन्शी
    • विद्यार्थी     दानेशजू
    • वैज्ञानिक   दानेशमंद
    • बेकार       बिकार
    • कलाकार    हुनरमंद
    • व्यवसायिक ताजेर

    • लोहार        आहनगार
    • सुतार          नजार
    •  लेखक        नविसंद

    • सरकारी नोकर    कारमंद ए दौलत 



    Monday 7 March 2011

    विभक्ति, विभक्ति प्रत्यय.

    मराठीत प्रथमा ते संबोधन अशा आठ विभक्ती आहेत.  त्यांचे कारकार्थ नामाचे वाक्यातील स्थान दाखवतात.
    आपण फार क्लीष्टता टाळून पुढे जाऊ.

    • बस गेली.                                              उतुबस रफ्त.

    •  मी शिराझ ला पाहिले.                           मन शिराझ रा दिदम.
    •  
    • मी दिल्लीकडे(ला) गेलो.                         मन  बे दिल्ली रफ़्तम.
    •  
    • मी दिल्ली हून आलो                              मन अझ दिल्ली आमदन.
    •  




    Friday 4 March 2011

    काही क्रिया

    येणे                   आमदन
    दूर होणे             तर्क कर्दन
    ओळखणे           शिनाख्तन
    जाणणे               दानेश्तन
    भेटणे                 मलागात (मुलाकात) कर्दन
    बोलणे                गोफ़्तन
    पाहणे                 दिदन
    थांबणे                मंदन
    घेणे                    बोरदन
    समजणे              फाहमिदन

    1. येथे ‘दन’ हा भाग ‘णे’ सारखा मागे चिकटतो, तो काढला की मूळ धातू मिळतो.
    जसे  
    वाच णे    मूळ धातू वाच   =  खान दन   मूळ धातू खान.


    • नकारार्थी क्रिया दाखवताना, ‘ना’ क्रियापदा आधी जोडतात.
    जसे 
    तो दिल्लीला गेला.              उ बे दिल्ली रफ्तम.
    तो दिल्लीला नाही गेला.      उ बे दिल्ली ना रफ्तम.


    काळ आणि क्रियापदांची रूपे.







    बुदन - असणे





    वर्तमान     भूत         चालू-भूत     भविष्य
    मीहस्तमबुदममिबुदमखाहम बुद
    तूहस्तीबुदीमिबुदीखाही बुद
    तो,ती,तेहस्तबुदमिबुदखाहद बुद
    आम्हीहस्तिमबुदिममिबुदिमखाहिम बुद
    तुम्हीहस्तिदबुदिदमिबुदिदखाहिद बुद
    तेहस्तंदबुदंदमिबुदंदखाहंद बुद


    रफ्तन - जाणे





    वर्तमान      भूत          चालू-भूत      भविष्य
    मीमिरवमरफ्तममिरफ्तमखाहम रफ्त
    तूमिरवीरफ्तीमिरफ्तीखाही रफ्त
    तो,ती,तेमिरवदरफ्तमिरफ्तखाहद रफ्त
    आम्हीमिरविमरफ्तिममिरफ्तिमखाहिम रफ्त
    तुम्हीमिरविदरफ्तिदमिरफ्तिदखाहिद रफ्त
    तेमिरवंदरफ्तंदमिरफ्तंदखाहंद रफ्त