अमीन अल मुल्क अशरफ अल दौला अलीक्झान्दर हान्नी बहादूर अर्सलन जंग ११८५ (हिजरी ) |
रोहीलखंडातील अफगाणांनी मराठ्यांविरोधात शुजा उद दौलाची मदत घेतली, पण त्या बदल्यातील रक्कम अदा करायला नकार दिला.
शुजा उद दौलाने इंग्रजांची मदत मागीतली, २३ एप्रील १७७४ ला मिरंपूर कत्रा च्या लढाईत इंग्रजांनी ४०,००० रोहिल्यांची फौज गारद केली. या लढाईत झालेल्या अत्याचार, लुटीवर बंगाल कौन्सीलने चौकशी कमिटी बसवली. वॉरन हेस्टीगच्या बाजूने साक्ष देणारा, गव्हर्नर जनरल च्या गळ्यातला ताईत बनला. पुढची सर्व कहाणी अवधच्या अनन्वीत लुटीची आहे. इंग्रजांच्याच शब्दात "त्याच्या छळाला कंटाळून झालेल्या बंडात १७८१ साली अवधच्या बेगमेच्या प्रेरणेने बनारसच्या राजा चैतसिंगाने ४००० ईग्रज शिपाई मारले, हान्नीला वाचवायला हेस्टीगला फौज पाठवावी लागली, हान्नी एखाद्या रक्त पिऊन फुगलेल्या जळूसारखा प्रचंड संपत्ती घेऊन कलकत्त्यात परतला पण....
वर्षभरातच एक्केचाळीसाव्या वर्षी मरून गेला."
त्याच्या अफाट संपत्तीतील ही अंगठी,
"अमीन अल मुल्क अशरफ अल दौला अलीक्झान्दर हान्नी बहादूर अर्सलन जंग ११८५ (हिजरी )" हा मजकूर कोरलेली.
वाचताना पर्शीयन नियमाप्रमाणे उजव्या खालच्या कोपऱ्यापासून सुरुवात करावी, नंतर वरच्या ओळीतील उजव्या बाजूने वाचावे.