Sunday 3 April 2011

मराठी नववर्षाच्या शुभेच्छा!

फारसीत ‘ नवरोज मुबारक ’ या शब्दांत नववर्षाच्या शुभेच्छा देतात.
نوروز مبارک 

नव रोज याचा अर्थ नवा प्रकाश असा होतो. मुळचा झरथ्रुष्ट्राने सुरू केलेला हा सण, आज मध्यअशियातील सर्व राष्ट्रांचा सण बनला आहे. २१ मार्चला होणाऱ्या वसंत संपाताच्या दिवशी हा सण येतो. वसंत ऋतूचा पहिला दिवस. पारसी नववर्ष या दिवशी सुरू होते.
इराणी लोक शेवटच्या महीन्यात घराची साफ सफाई करतात. याला ख़ाने तेकौनी म्हणजे घर झटकणे म्हणतात. वसंत गोठलेल्या सृष्टीत नव्याने प्राण फुंकतो म्हणून हे महत्वाचे!
सणासाठी नवे कपडे परीधान करून परिवारच्या गाठीभेटी , त्यातही ज्येष्ठांच्या भेटी घेतल्या जातात. भेटीला येणाऱ्यांचे स्वागत मेवा मिठायांनी केले जाते. मेजवान्या झडतात.
लोक रस्त्यावर, गल्ल्यांतून जमतात. होळी पेटवतात, आणि त्याभोवती गातात ‘जर्दी ए मन अझअने तो, सोर्खी ए तो अझअने मन’ -हे अग्नी, माझ्या वर (हिवाळ्यात) पसरलेला पिवळेपणा तुला घे, तुझा (आरोग्याचा) लाल पणा मला दे.
आपल्या होळी या सणाची आठवण होते ना?