Monday 21 February 2011

अनेक वचन

सजीवांचे अनेक वचन ‘आन’ प्रत्यय जोडून होते.
पुरुष :       मर्द - मर्दान
स्त्री :         झन -झनान


निर्जीवांचे अनेक वचन ‘हा’ प्रत्यय जोडून होते.
फूल :       गुल - गुलरा  (जीवशास्त्रात फूल सजीव आहे इथे ‘ते’ फूल)

प्राण्यांत अनेक वचन ‘आन’ किंवा ‘हा’ प्रत्यय जोडून होते.
घोडा :      अस्ब- अस्बान अस्बहा

शेवटी अलिफ़ किंवा वाव असेल (आ /उ ने शेवट असेल) तर ‘यान’ ने अनेक वचन होते.
भिकारी :           गदा - गदायान
वाईटबोलणारा:  बदगू -  बदगुयान

शेवटी हे  असेल (हा शेवट असेल) तर ‘गान’ ने अनेक वचन होते
देवदूत :    फीरीश्ता(ह) - फीरीश्तागन
बाळ:         बच्चा(ह) - बच्चागन

काहीवेळा ‘आत’ / ‘खात’ने अनेक वचन होते,  पण ते अरबी भाषेच्या प्रभावाने.
उपकार : नवाजीश - नवाजिशात


इतर काही उदाहरणे

भाकरी (नान): नान                  नानहा
सूर्य                आफ़्ताब           आफ़्ताबहा




*जरी हे सर्व प्रकार प्रतिष्ठित भाषेत वापरले जात असले तरी नेहमीच्या भाषेत ‘हा’ प्रत्ययाने अनेक वचन दाखवता येते.