Sunday 20 February 2011

फार्सी शब्द महसूली

आबकारी - दारू वरचा कर
अबोआब (अब्वाब) - जमीनी वरील कर
अब्वाब फ़ौजदारी - शुजा खानाने बसवलेला कायम स्वरूपी कर
अब्वाब तनेबदारी - बाजारातल्या दुकानांवर आकारलेला कर
अदबक - छोटे माप/ वजन
अदालत - न्यायालय
अब्दाबंदी - कर्ज परतफेडीचा काळ
अबुक अब्वाब - मुर्शीदाबाद किल्ल्याच्या चुन्यासाठी अलिवर्दी खानाने लादलेला कर
 अजारब - शेत
अजारबदार - शेतकरी (सारा देणारा)


आखरी हिसाब खर्चा/
वसूल बाकी खर्चा -वर्ष आखेरीस रयतेच्या खात्याची केवळ शिल्लक
आखरी जमा वसूल बाकी
आखरी निकास -परगणा/ तरफ आणि गावकामगार, रयत यांचा तळेबंद


आबदार खाना - सरबत (बर्फात ठेवून) थंड करायची खोली


बासनी - बासरी
बाला घाट - वरचा घाट
पाईन घाट - खालचा घाट


बट्टा - रुपयाचा विनिमय दर


ब हाल - आजच्या प्रमाणे कायम करणे
बहाली सनद -(पूर्वी काढून घेतलेली) मालकी परत करणे


बजन्तरी महाल -वाजंत्री वाले आणि नर्तकांवरील कर


ब्रिन्जारा - ब्रिन्ज= तांदूळ,  आरा - आणणे (वंजारी) सैन्याला रसद पुरवणारा.


गज - लांबी मोजण्याचे माप
तीन प्रकारचे गज होते, लांब मध्यम आखूड, लांब गजाने जमीन मोजत. त्याचे २४ भाग करीत, प्रत्येकाला तसू म्हणत.